PMC Bharati 2024 : तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती बातमी ऐकून तुम्ही नक्की खुश व्हाल. पुणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त असलेल्या पदाच्या जागा भरण्यासाठी पदभरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.(Pune Mahanagarpalika Bharati 2024)
रिक्त जागांचा तपशिल
पुणे महानगरपालिका (Pune Mahanagarpalika Bharati 2024) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी-3)अशा या पदाच्या एकूण 113 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.(Pune Mahanagarpalika Recruitment 2024)
महत्वाच्या तारखा
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख 16 जानेवारी 2024 आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे आणि ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची मुदत दि.16 जानेवारी 2024 पासून दि.05 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे आणि परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या 7 दिवस आधी आहे. (अधिक माहितीसाठी उमेदवाराने मूळ जाहिरात पहावी.)
शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्णवेळ पदवी/पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक
वयोमर्यादा
या भरतीसाठी किमान वयोमर्यादा 18 असावे व कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष व मागास प्रवर्गासाठी 43 वर्ष वयोमर्यादा आहे. (मूळ जाहिरात पहावी)
रिक्त पदे
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 113 पदे
वेतनश्रेणी
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)– S- 14, 38600 – 122800
अर्ज शुल्क
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रू तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रू अर्ज शुल्क आहे.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |