Navi Mumbai bharati 2024 : नवी मुंबई महानगरपालिका येथे रिक्त पदासाठी भरती

NNMC Bharati 2024;तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती बातमी ऐकून तुम्ही नक्की खुश व्हाल.नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत रिक्त असलेल्या पदाच्या जागा भरण्यासाठी पदभरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.(navi mumbai mahanagarpalika Bharati 2024)

 

रिक्त जागांचा तपशिल

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान ( NUHM Bharati 2024) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ), स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष), ए.एन.एम.. औषधनिर्माता, एपिडेमियोलॉजिस्ट अशा या पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.(NUHM Recruitment 2024)

 

महत्वाच्या तारखा

या भरती प्रक्रियेत वैद्यकीय अधिकारी या पदाकरीता थेट मुलाखत (Walk in interview) दि. 31/01/2024 रोजी घेण्यात येईल व नर्स (स्त्री), स्टाफ नर्स (पुरुष),ए.एन.एम. औषधनिर्माता व इपिडेमोलॉजिस्ट, पदाकरीता इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज दि 17 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत (अधिक माहितीसाठी उमेदवाराने मूळ जाहिरात पहावी.)

 

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता

वैद्यकीय अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापिठाची M.B.B.S पदवी. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी बंधनकारक

शासकीय/खाजगी यांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक

स्टाफ नर्स (स्त्री) स्टाफ नर्स (पुरुष) – 12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड

वाईफ किंवा B.sc. Nursing/GNM महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक

ए.एन.एम – 10 वी पास आणि ए.एन.एम. कोर्स उत्तीर्ण महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी बंधनकारक

औषधनिर्माता बी फार्म पदवीधर किवा डी. फार्म फार्मासी कॉन्सिल नोंदणी

इपिडेमोलॉजिस्ट – Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health

वयोमर्यादा

या भरतीसाठी वैद्यकीय अधिकारी पदासाठी 70 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष), ए.एन.एम, औषधनिर्माता, एपिडेमियोलॉजिस्ट या पदासाठी कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष व मागास प्रवर्गासाठी 43 वर्ष वयोमर्यादा आहे. (मूळ जाहिरात पहावी)

रिक्त पदे

वैद्यकीय अधिकारी – 04 पदे

स्टाफ नर्स (महिला) – 13 पदे

स्टाफ नर्स (पुरुष) – 02 पदे

ए.एन.एम – 07 पदे

औषधनिर्माता – 01 पदे

एपिडेमियोलॉजिस्ट – 01 पदे

 

वेतनश्रेणी

वैद्यकीय अधिकारी – 60,000/-

स्टाफ नर्स (महिला) – 20,000/-

स्टाफ नर्स (पुरुष) – 20,000/-

ए.एन.एम- 18,000/-

औषधनिर्माता – 17,000/-

एपिडेमियोलॉजिस्ट – 35,000/-

 

मुलाखतीचा पत्ता

आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.1, से.15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614

Leave a Comment