Site icon KUSHAL NEWS

Jalsandharan Vibhag: मृद व जलसंधारण विभागात 670 रिक्त पदासाठी भरती

Mrud jalsandharan vibhag Bharati 2024;तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती बातमी ऐकून तुम्ही नक्की खुश व्हाल. मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत रिक्त असलेल्या पदाच्या जागा भरण्यासाठी पदभरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.(Mrud jalsandharan vibhag Bharati 2024

रिक्त जागांचा तपशिल

मृद व जलसंधारण विभाग (Mrud jalsandharan vibhag Bharati 2024) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) अशा या पदाच्या एकूण 670 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.(Mrud jalsandharan vibhag Recruitment 2024)

महत्वाच्या तारखा

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख 21 डिसेंबर 2023 आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2024 आहे आणि ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची मुदत दि.21 डिसेंबर 2023 पासून दि.10 जानेवारी 2024 पर्यंत आहे.(अधिक माहितीसाठी उमेदवाराने मूळ जाहिरात पहावी.)

जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

शैक्षणिक पात्रता

•जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) :- उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका (Diploma in civil engineering) किंवा पदवी (Degree in civil engineering) किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता (शासन मृद व जलसंधारण विभाग राजपत्र जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट ब, राजपत्रित सेवाप्रवेश नियम दिनांक 21 सप्टेंबर 2021)

साईटवर जाण्यासाठी क्लिक करा

वयोमर्यादा

या भरतीसाठी किमान वयोमर्यादा 19 असावे व कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष व मागास प्रवर्गासाठी 43 वर्ष वयोमर्यादा आहे. (मूळ जाहिरात पहावी)

रिक्त पदे

जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) :- 670 पदे

वेतनश्रेणी

जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) :- एस – 15: 41800 – 132300 (सातव्या वेतन आयोगा नुसार)

अर्ज शुल्क

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रू तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रू अर्ज शुल्क आहे.

Exit mobile version