Arogya Vibhag Bharati 2024 : तुम्ही जर एक चांगल्या सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती बातमी ऐकून तुम्ही नक्की खुश व्हाल. सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट – अ रिक्त असलेल्या पदाच्या जागा भरण्यासाठी पदभरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.(Arogya vibhag Bharati 2024)
रिक्त जागांचा तपशिल
सार्वजनिक आरोग्य विभाग (Arogya vibhag Bharati 2024) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये वैद्यकीय अधिकारी गट – अ अशा या पदाच्या एकूण 1729 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.(Arogya vibhag Recruitment 2024)
महत्वाच्या तारखा
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे .(अधिक माहितीसाठी उमेदवाराने मूळ जाहिरात पहावी.)
जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
शैक्षणिक पात्रता
•वैद्यकीय अधिकारी – एम.बी.बी.एस
वैद्यकीय अधिकारी – बी.ए.एम.एस
साईटवर जाण्यासाठी क्लिक करा
वयोमर्यादा
सार्वजनिक आरोग्य विभाग (Mrud jalsandharan vibhag Bharati 2024) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी किमान वयोमर्यादा 18/19 असावे व कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष व मागास प्रवर्गासाठी 43 वर्ष वयोमर्यादा आहे. (मूळ जाहिरात पहावी)
रिक्त पदे
सार्वजनिक आरोग्य विभाग (Mrud jalsandharan vibhag Bharati 2024) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी रिक्त पदे खालील प्रमाणे आहे.
वैद्यकीय अधिकारी – एम.बी.बी.एस – 1446
वैद्यकीय अधिकारी – बी.ए.एम.एस – 283
वेतनश्रेणी
सार्वजनिक आरोग्य विभाग (Mrud jalsandharan vibhag Bharati 2024) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी वेतनश्रेणी खालील प्रमाणे आहे.
वैद्यकीय अधिकारी – एस-२०:- रु.५६,१००-१,७७,५००)
अर्ज शुल्क
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रू तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 700 रू अर्ज शुल्क आहे.
१. महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संस्थांमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-“अ” (एस-२०) या संवर्गातील “वैद्यकीय अधिकारी” या पदावरील भरतीकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
२. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट “अ” या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी (एस-२०) या पदावर सरळसेवेने पदभरती करण्यासाठी http://arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संपूर्ण जाहिरात / अर्जाबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांनी https://www.morecruitment.maha-arogya.com_या संकेतस्थळावर सदर अर्ज पूर्णपणे ONLINE पद्धतीने भरावयाचे आहेत.
३. उमेदवारांनी ONLINE अर्जासोबत खाली नमूद केलेल्या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या स्व-साक्षांकीत प्रती UPLOAD करणे आवश्यक आहे. अन्यथा उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
३.१ जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाण,
2/10
३.२ महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे (अधिवास/Domicile) प्रमाणपत्र
३.३ राखीव प्रवर्गातून अर्ज केल्यास जात व जात वैधता प्रमाणपत्र
३.४ राखीव प्रवर्गातून अर्ज केल्यास लागू असेल त्या प्रवर्गास शासकीय नियमानुसार आवश्यक असलेले Non-Creamy-Layer प्रमाणपत्र.
३.५ खुल्या प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरीता, खुल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील माहिलांनी Non-Creamy-Layer प्रमाणपत्र सादर करण्याबाबत महिला व बालविकास विभाग, शा.नि.क्र. महिआ २०२३/ प्र.क्र.१२३/कार्या-२, दि.०४.०५.२०२३ मधील तरतुदी लागू राहतील.
३.६ जाहिरातील परिच्छेद ८.४ नुसार आंतरवासिता (Internship) पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
३.७ अर्जाच्या दिनांकास वैध असलेले महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडील (MMC/NMC) नोंदणी प्रमाणपत्र /Renewal receipt
३.८ जाहिरातील परिच्छेद ९.३ व ९.४ नुसार अनुभव प्रमाणपत्र
३.९ स्वत:चा पासपोर्ट साईजचा फोटो (140 pixel height and 100 pixel width) (10 MB पेक्षा जास्त नसावा)
३.१० स्वस्वाक्षरीचा नमुना (JPEG file) (50 pixel height and 100 pixel width) (10 MB पेक्षा जास्त नसावा) ३.११ आधार कार्ड
३.१२ परदेशातुन एमबीबीएस पदवी घेतलेल्या उमेदवाराची NBE गुणपत्रिका
३.१३ वैद्यकीय पदवीच्या सर्व वर्षांच्या गुणपत्रिका, पदवी/पदव्युत्तर पदविका/पदव्युत्तर पदवी यांचे प्रमाणपत्र
३.१४ दिव्यांगाचे प्रमाणपत्र (Online certificate) (दिव्यांग असल्यास)
३.१५ खेळाडू प्रर्वगातुन अर्ज करीत असल्यास, शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचा शासन निर्णय क्र. राक्रीधो- २००२/प्र.क्र.६८/क्रियुसे-२, दि.०१.०७.२०१६, तसेच शासन शुध्दीपत्रक शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, क्र.राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रियुसे-२, दि.१८.०८.२०१६, शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, क्र.संकीर्ण-१७१६/प्र.क्र.१८/क्रियुसे-२, दि.३०.०६.२०२२ व तदनंतर शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्राविण्य प्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादेतील सवलती संदर्भात कार्यवाही करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूचे प्रमाणपत्र तसेच शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचा शासन निर्णय क्र.राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रियुसे-२. दि.०१.०७.२०१६. मधील सर्वसाधारण अर्हतामधील मुद्दा क्र. ४ (M) नुसार अर्जासोबत विभागीय उपसंचालक यांनी क्रिडा
१२. ऑनलाईन अर्ज भरावयाची प्रक्रिया:-
१२.१ महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट “अ” या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावर सरळ सेवेने पदभरती करण्यासाठी http://arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्जाबाबतची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार https://www.morecruitment.maha- arogya.com या संकेतस्थळावरून सदर अर्ज पूर्णपणे ONLINE पद्धतीने भरावयाचा आहे.
१२.२ उमेदवाराचे अर्जाचे शुल्क केवळ ONLINE पध्दतीने स्वीकारले जाईल. इतर कोणत्याही पद्धतीने शुल्क स्विकारले जाणार नाही.
१२.३ स्वयंप्रमाणपत्र, विहीत शुल्क व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज दिनांक ०१.०२.२०२४ सकाळी १०,०० पासून ते १५.०२.२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत या https://www.morecruitment.maha-arogya.com संकेतस्थळावर ONLINE पद्धतीने भरावेत.
१२.४ टपालाने अथवा अन्य मार्गाने सादर केलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्विकारले जाणार नाहीत.
१३ . शुल्क :-
उमेदवारांनी अर्ज सादर करताना खालीलप्रमाणे शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरावे. एकदा भरलेले परीक्षा
शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही.
अराखीव प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु. १०००/-
मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु. ७००/-
उपरोक्त शुल्का व्यतिरिक्त बैंक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.