Zp Thane Bharati 2023;तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती बातमी ऐकून तुम्ही नक्की खुश व्हाल. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट क मधील सरळसेवेची रिक्त असलेल्या पदाच्या जागा भरण्यासाठी पदभरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.(zp Thane Recruitment 2023)
रिक्त जागांचा तपशिल
जिल्हा परिषद ठाणे (ZP Thane) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष) 40% , आरोग्य परिचारिका [आरोग्य सेवक (महिला)], कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य),कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ लेेेेखा अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, पशुधन पर्यवेक्षक, लघुुलेखक (निम्न श्रेणी), वरिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग 3 श्रेेणी 2) आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघू पाटबंधारे) अशा या पदाच्या एकूण 255 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.(Zp Thane Recruitment 2023)
महत्वाच्या तारखा
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख 05 ऑगस्ट 2023 आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे (अधिक माहितीसाठी उमेदवाराने मूळ जाहिरात पहावी.)
जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
शैक्षणिक पात्रता
•आरोग्य पर्यवेक्षक :- ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल
आरोग्य सेवक (पुरुष) 40% :- विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार. ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेला नसेल तर अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्ती नंतर तीन संधीत यशस्वीरीत्या पूर्ण करणे आवश्यक राहील.
• आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी):-विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसांचा अनुभव धारकांना प्राधान्य देण्यात येईल. ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेला नसेल तर अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्ती नंतर तीन संधीत यशस्वीरीत्या पूर्ण करणे आवश्यक राहील. राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसांचा अनुभव धारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवारांची निवड करण्यात येईल.
•आरोग्य परिचारिका [आरोग्य सेवक (महिला)] :- ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.
• कंत्राटी ग्रामसेवक :- किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60% गुणांसह उत्तीर्ण किंवा शासन मान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा शासन मान्य संस्थेची समाजकल्याणाची पदवी ( b.s.w) किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अर्हता आणि कृषी पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम किंवा कृषी विषयाची पदवी किंवा उच्च अर्हता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेले उमेदवारांना अधिक पसंती. संगणक हाताळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.
•कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा) :- स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका ( तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
कनिष्ठ अभियंता (विद्युत) :- विद्युत अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करीत असतील असे उमेदवार
कनिष्ठ लेखा अधिकारी :- ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणतेही सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान 5 वर्षाचा अखंड सेवेचा ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारामधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल
या बाबतीत लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्यांना अथवा प्रथम वा द्वितीय वर्गातील पदवी धारण करणाऱ्यांना अधिक पसंती दिली जाईल किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखा शास्त्र व लेखा परीक्षा हे प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. याबतीत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधिकरणातील लेखा कार्याचा अनुभव असणाऱ्यास अधिक पसंती दिली जाईल.
• कनिष्ठ सहाय्यक :- माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या इतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त, शासकीय परीक्षा विभाग, शिक्षण संचालनालय , महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनिटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा मराठी टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील असे उमेदवार
परंतु असे की, इंग्रजी विषय घेऊन माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या किंवा इतर भाषेतील टंकलेखनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल.
महाराष्ट्र शासन, ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय दिनांक 06 जानेवारी 1997 नुसार मराठी टंकलेखन आवश्यक राहील.
परंतु उक्त दोन भाषांपैकी मराठी भाषेतील गतीच्या प्रमाणपत्रानुसार नियुक्त केलेले उमेदवार, नियुक्त केलेल्या तारखेपासून दोन वर्षाच्या कालावधीत इंग्रजी भाषेतील दर मिनीटास 40 शब्दाहूंन कमी नाही अशा टंकलेखनाच्या गतीचे प्रमाणपत्र मिळवतील असे उमेदवार
•कनिष्ठ सहाय्यक लेखा :- माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी टंकलेखन व लघुलखेन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त, शासकीय परीक्षा विभाग, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी मराठी टंकलेखनाचे दर मिनिटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या किंवा इतर भाषेतील टंकलेखनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल.
तसेच लेखविषयक कामकाजाचा पूर्वानुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल.
•पशुधन पर्यवेक्षक :- (दोन) (अ) संविधिक विद्यापीठाची, पशुवैद्यक शास्त्रातील पदवी धारण करीत असलेल्या व्यक्ती , किंवा
(ब) पशुधन पर्यवेक्षक, पशुपाल, पशुधन सहाय्यक, सहायक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी (ब श्रेणी) या बाबतची पशुसंवर्धन संचालनायालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणाऱ्या व्यक्ती.
(1) त्यावेळेच्या मुंबई राज्याने चालविलेल्या अभ्यासक्रमासह, पशुवैद्यक पशुपाल प्रशिक्षण अभ्यासक्रम
(2) पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन आणि राज्यातील विवध संविधीक कृषी विद्यापीठे यांनी चालविलेल्या पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम
(3) पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी चालविलेल्या पशुवैद्यक व पशसंवर्धन शास्त्रातील दोन वर्षाचा सेवांतर्गत पदविका अभ्यासक्रम (आणि)
(4) खालील संस्थांनी चालविलेला पशुवैद्यक शास्त्र विषयासह दुग्धाशाळा व क्षेत्र व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका या मधील दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम,
(एक) महाराष्ट्र तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ, किंवा
(दोन) राज्यातील विविध संविधिक कृषी विद्यापीठे किंवा
(5) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्यामार्फत चालविण्यात येणारा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण
माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्याकडून वेळोवेळी विहित केलेले संगणक वापराबाबतचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे
••लघुलेखक (निम्न श्रेणी) :- महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम 1965 (सन 1965 चा महाराष्ट्र अधिनियम 41) या अन्वये स्थापन केलेल्या विभागीय मंडळाने शिक्षणाच्या माध्यमिक टप्प्याच्या अखेर घेतलेली माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तिच्याशी तुल्य परीक्षा उत्तीर्ण असतील असे उमेदवार आणि
तसेच आयुक्त, शासकीय परीक्षा विभाग, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडून विनीर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले इंग्रजी किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 100 श.प्र.मि. पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 श.प्र.मि.किंवा मराठी टंकलेखनातील दर मिनिटास 30 श.प्र.मि. पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक
विभागाकडील शासन निर्णय दिनांक 06 जानेवारी 1997 नुसार मराठी टंकलेखन व मराठी लघुलेखन आवश्यक राहील.
•वरिष्ठ सहाय्यक :- संविधीमान्य विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार
•वरिष्ठ सहाय्यक लेखा :- मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील या बाबत लेखा शास्त्र व लेखा परीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्या अथवा पहिल्या किंवा दुसऱ्या वर्गातील पदवी धारण करणाऱ्या अथवा कोणत्याही सरकारी कार्यालयात अथवा व्यापारी संस्थेत अथवा स्थानिक प्राधिकरणात तीन वर्षांहून कमी नसेल इतक्या अखंड कालावधी प्रर्यंत लेखा विषयक कामांचा पदवी नंतरचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल
•विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग 3 श्रेणी 2):- कोणत्याही मान्यतप्राप्त विद्यापीठाची बी ए / बी कॉम / बी एस सी. ही पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असेल आणि ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एड अथवा समकक्ष पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांना मान्यताप्राप्त प्राथमिक / माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, अध्यापक विद्यालयातील शासनमान्य पदावरील सक्षम प्राधिकाऱ्याने वैयक्तिक मान्यता दिलेला किमान तीन वर्षाचा अध्यापनाचा किंवा प्रशासनाचा अनुभव आहे, असे उमेदवार
•स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक :- माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील, आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार संविधीमान्य व तत्सम खालील पाठ्यक्रम 1) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या एक वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा 2) आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन (वास्तुशास्त्रीय आरेखक ), किंवा 3) कन्स्ट्रक्शन सुपरवायझर (बांधकाम पर्यवेक्षक) किंवा 4) आरेखक (स्थापत्य) हा दोन वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा 5) सैनिकी सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदविका,पदवी,पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील असे उमेदवार