Thane Mahanagarpalika:तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती बातमी ऐकून तुम्ही नक्की खुश व्हाल. ठाणे महानगरपालिका अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, ठाणे येथे रिक्त असलेल्या पदाच्या जागा भरण्यासाठी पदभरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.(Thane Mahanagarpalika Bharati 2024)
रिक्त जागांचा तपशिल
ठाणे महानगरपालिका अंतर्गत (Thane Mahanagarpalika Recruitment 2024) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, ठाणे यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये पलमोनरी लॅब टेक्निशियन, ई.सी.जी टेक्निशियन, ऑडीओमेट्री टेक्निशियन, वॉर्ड क्लार्क, अल्ट्रा सोनोग्राफी/सी.टी.स्कॅन तत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, सहायक क्ष-किरण तंत्रज्ञ, मशीन तंत्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, ज्युनिअर टेक्निशियन, सिनियर टेक्निशियन, ई.ई.जी.टेक्निशियन, ब्लड बँक टेक्निशियन, प्रोस्टेस्टिक व ऑर्थोटिक टेक्निशियन, एंडॉस्कोपी टेक्निशियन, ऑडीओव्हीज्यूअल टेक्निशियन अशा या पदाच्या एकूण 118 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.(Thane Mahanagarpalika Recruitment 2024)
महत्वाच्या तारखा
मुलाखतीचा दिनांक
•१)पलमोनरी लॅब टेक्निशियन, २)ऑडीओमेट्री टेक्निशियन,३)अल्ट्रा सोनोग्राफी/सी.टी.स्कॅन तत्रज्ञ, ४)मशीन तंत्रज्ञ, ५)ई.ई.जी.टेक्निशियन व ६)प्रोस्टेस्टिक व ऑर्थोटिक टेक्निशियन: १५ जानेवारी २०२४
•१)क्ष-किरण तंत्रज्ञ,२)सहायक क्ष-किरण तंत्रज्ञ,३)दंत तंत्रज्ञ,४)एंडॉस्कोपी टेक्निशियन व ५)ऑडीओव्हीज्यूअल टेक्निशियन: १६ जानेवारी २०२४
१)ई.सी.जी.टेक्निशियन, व २)ज्युनिअर टेक्निशियन: १८ जानेवारी २०२४
•१)वॉर्ड क्लार्क व २)सिनियर टेक्निशियन ३)ब्लड बँक टेक्निशियन: १९ जानेवारी २०२४(अधिक माहितीसाठी उमेदवाराने मूळ जाहिरात पहावी.)
जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
शैक्षणिक पात्रता
•१)पलमोनरी लॅब टेक्निशियन: मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी
शासनमान्य संस्थेतील डी.एम.एल.टी इन पी.एफ.टी (D.M.L.T IN P.F.T)
३) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील बी.पी.एम.टी इन पी.एफ.टी (B.P.M.T IN P.F.T) असल्यास प्राधान्य
४) शासकीय/निमशासकीय/वैद्यकीय महाविद्यालयातील/खाजगी रुग्णालयाकडील पलमोनरी लॅब टेक्निशियन अथवा समकक्ष कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
५) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
•२)ई.सी.जी.टेक्निशियन: महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान शाखेसह)
२)शासनमान्य संस्थेकडील हृदयस्पंदन आलेख तंत्रज्ञ (DIPLOMA IN E.C.G TECHNOLOGY) या विषयाचे प्रशिक्षण पूर्ण.
३)शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी संस्थेच्या हॉस्पिटलकडील ई.सी.जी.तंत्रज्ञ अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
४)मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
•३)ऑडीओमेट्री टेक्निशियन: मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी
(ऑडीओमेट्री टेक्निशियन विषयासह)
२)शासन मान्यता प्राप्त रुग्णालयातील ऑडीओमेट्री टेक्निशियन म्हणून ३ वर्षे काम केल्याचा अनुभव
३)मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
•४)वॉर्ड क्लार्क: मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी.
२)मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रती मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रती मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा शासनमान्य संस्थेचे संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
३)शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी संस्थेकडील वॉर्ड क्लार्क अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
४)मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
•५)अल्ट्रा सोनोग्राफी/सी.टी.स्कॅन तत्रज्ञ: १) मान्यता प्राप्त विद्यापिठाची भौतिकशास्त्र/इलेक्ट्रानिक्स विषयासह विज्ञान शाखेची पदवी.
२) शासनमान्य संस्थेकडील अल्ट्रा सोनोग्राफी तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण.
३) शासकीय / निमशासकीय/ स्थानिकस्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील अल्ट्रा सोनाग्राफी तंत्रज्ञ अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
•६)क्ष-किरण तंत्रज्ञ:१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील रेडियोग्राफी मधील (बी.एम.आर.टी.) पदवी.
२) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी वैद्यकीय रुग्णालयातील क्ष-किरण तंत्रज्ञ या कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
•७)सहायक क्ष-किरण तंत्रज्ञ:१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील रेडियोग्राफी मधील (बी.एम.आर.टी.) पदवी.
२) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी वैद्यकीय रुग्णालयातील सहायक क्ष – किरण तंत्रज्ञ या कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
•८)मशीन तंत्रज्ञ:१) शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील मशीन ऑपरेटर अभ्यासक्रम पूर्ण व तद्नंतर एन.सी.टी.व्ही.टी. चे प्रमाणपत्र आवश्यक.
२) मान्यताप्राप्त संस्थेकडील डिप्लोमा इन मॅकेनिकल इंजिनिअरींग असल्यास प्राधान्य.
३) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी रुग्णालयाकडील मशीन तंत्रज्ञ अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
•९)दंत तंत्रज्ञ:१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. (विज्ञान शाखेसह)
२) डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेने मान्यता दिलेल्या डेंटल इन्स्टिट्युट मार्फत घेतलेल्या डेंटल मेकॅनिक कोर्सची अंतिम परीक्षा उत्तीर्ण.
३) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी रुग्णालयाकडील दंत तंत्रज्ञ अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
४) वेळोवेळी सुधारणा केलेल्या डेंटल अॅक्ट १९४८ नूसार दंत तंत्रज्ञ म्हणून वैद्यकीय नोंदणी आवश्यक.
५) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
•१०)ज्युनिअर टेक्निशियन:१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी.
२) शासनमान्य संस्थेकडील डी.एम.एल.टी. उत्तीर्ण
३) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी शैक्षणिक संस्थेकडील ज्युनिअर टेक्नीशियन अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
•११)सिनिअर टेक्निशियन:१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी.
२) शासनमान्य संस्थेकडील डी.एम.एल.टी. उत्तीर्ण
३) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी शैक्षणिक संस्थेकडील सिनिअर टेक्नीशियन अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
•१२)ई.ई. जी. टेक्निशियन:१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी
(BSC) व ईईजी टेक्निशियन पदवी.
२) शासन मान्यता प्राप्त रुग्णालयातील ईईजी टेक्निशियन म्हणून काम तीन वर्षे काम केल्याचा अनुभव.
३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
•१३)ब्लड बँक टेक्निशियन:१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी (BSC).
२) शासन मान्य संस्थेकडील डी.एम.एल.टी. कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.
३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
१४)प्रोस्टेटिक व ऑथॉटिक टेक्निशियन:१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी (प्रोस्थेटिक व आर्थोटिक टेक्नीशियन)
२) शासनमान्य रुग्णालयीन कामाचा ३ वर्षांचा अनुभव.
३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
१५)एंडोस्कोपी टेक्निशियन:१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एन्डोस्कोपी टेक्निशियन विषयातील पदवी.
२) शासन मान्य रुग्णालयातील एन्डोस्कोपी टेक्निशियन म्हणून ३ वर्षांचा अनुभव.
३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
१६)ऑडीओव्हिज्युअल टेक्निशियन:१) महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (HSC)
२) शासनमान्य संस्थेतील सिने प्रोजेक्शन कोर्स पूर्ण.
३) शासकीय/निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्थेकडील
ऑडीओ व्हिज्युअल टेक्नीशियन अथवा समकक्ष कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव
४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
वयोमर्यादा
या भरतीसाठी कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष व मागास प्रवर्गासाठी 43 वर्ष वयोमर्यादा आहे. (मूळ जाहिरात पहावी)
रिक्त पदे
१)पलमोनरी लॅब टेक्निशियन: ०१ पदे
२)ई.सी.जी. टेक्निशियन: १४ पदे
३)ऑडीओमेट्री टेक्निशियन: ०१ पदे
४)वार्ड क्लार्क : १२ पदे
५)अल्ट्रा सोनोग्राफी/सी.टी.स्कॅन तत्रज्ञ: ०१ पदे
६)क्ष-किरण तंत्रज्ञ: १२ पदे
७)सहायक क्ष-किरण तंत्रज्ञ: ०५ पदे
८)मशीन तंत्रज्ञ: ०१ पदे
९)दंत तंत्रज्ञ: ०३ पदे
१०)ज्युनिअर टेक्निशियन: ४१ पदे
११)सिनिअर टेक्निशियन: ११ पदे
१२)ई.ई. जी. टेक्निशियन: ०१ पदे
१३)ब्लड बँक टेक्निशियन: १० पदे
१४)प्रोस्टेटिक व ऑथॉटिक टेक्निशियन: ०१ पदे
१५)एंडोस्कोपी टेक्निशियन: ०२ पदे
१६)ऑडीओव्हिज्युअल टेक्निशियन: ०२ पदे
वेतनश्रेणी
१)पलमोनरी लॅब टेक्निशियन: रु. २५,०००/-
२)ई.सी.जी. टेक्निशियन: रु. २५,०००/-
३)ऑडीओमेट्री टेक्निशियन: रु. २५,०००/-
४)वार्ड क्लार्क : रु. २५,०००/-
५)अल्ट्रा सोनोग्राफी/सी.टी.स्कॅन तत्रज्ञ: रु. २५,०००/-
६)क्ष-किरण तंत्रज्ञ: रु. २५,०००/-
७)सहायक क्ष-किरण तंत्रज्ञ: रु. २५,०००/-
८)मशीन तंत्रज्ञ: रु. २५,०००/-
९)दंत तंत्रज्ञ: रु. २५,०००/-
१०)ज्युनिअर टेक्निशियन: रु. २५,०००/-
११)सिनिअर टेक्निशियन: रु. २५,०००/-
१२)ई.ई. जी. टेक्निशियन: रु. २५,०००/-
१३)ब्लड बँक टेक्निशियन: रु. २५,०००/-
१४)प्रोस्टेटिक व ऑथॉटिक टेक्निशियन: रु. २५,०००/-
१५)एंडोस्कोपी टेक्निशियन: रु. २५,०००/-
१६)ऑडीओव्हिज्युअल टेक्निशियन: रु. २५,०००/-
मुलाखतीचा पत्ता
कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे. येथे खालील पदासाठी त्या-त्या संवर्गाच्या समोर दर्शविलेल्या दिनांकास सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस (walk in interview) उपस्थित रहावे.